शिवसेना आमदार अपात्रतेवर राहुल नार्वेकरांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले की, अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. मी ज्या तरतुदी आहेत त्यावर निर्णय घेईन. मी नियमानुसार काम करणार आहे.
माझ्या परदेश दौऱ्याबद्दल मी आधीच बोललो होतो. कसही करून अध्यक्ष यांच्यावर दबाव आणायचा असा प्रकार सुरू आहे. पण मी दबावापेक्षा नियमानुसार काम करणार आहे. मी आरोपावर उत्तर देत नाही. कुणाचीही बाजू न ऐकता मी निर्णय दिला तर उद्या हेच लोक बोलणार यांना नियम आणि संविधानाचे ज्ञान नाही. सर्वाना संधी दिली जाणार कुणीही कुठलाही आरोप केला तरी मी नियमात काम करणार. असे राहुल नार्वेकर म्हणाले.