राजकारण

Rahul Gandhi : जम्मू - काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणूक निकालावर राहुल गांधी ट्विट करत म्हणाले...

जम्मू - काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू - काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. जम्मू-काश्मीर, हरियाणाचा कौल कुणाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे.

यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या जनतेचे मनापासून आभार - राज्यात इंडियाचा विजय हा संविधानाचा विजय आहे, लोकशाही स्वाभिमानाचा विजय आहे. हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे आम्ही विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारींची माहिती निवडणूक आयोगाला देणार आहोत.

यासोबतच ते म्हणाले की, हरियाणातील सर्व लोकांचे आणि आमच्या बब्बर शेर कार्यकर्त्यांचे त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल मनःपूर्वक आभार. हक्क, सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि सत्याचा आम्ही हा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमचा आवाज बुलंद करत राहू. असे राहुल गांधी म्हणाले.

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार; 'या' तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना

पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळली; 2 ते 3 कामगारांचा मृत्यू