राजकारण

राहुल गांधींची पदयात्रा फक्त काँग्रेसपूरतीच; गुजरात निवडणूकीवरुन बच्चू कडूंचा टोला

गुजरात निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. भाजपाने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला असून काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झालेली दिसत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूरज दहाट | अमरावती : गुजरात निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. भाजपाने रेकॉर्डब्रेक विजय मिळवला असून काँग्रेसची पूर्णपणे वाताहत झालेली दिसत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची पदयात्रा फक्त काँग्रेसपुरतीच होती, असा टोला त्यांनी लगावला आहे.

बच्च कडू म्हणाले की, गुजरात निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपला गड काबीज केला आहे. पंतप्रधान मोदींच्या विकास कामांनी हा गड पुन्हा जिंकला आहे. विरोधी पक्ष हा कमकुवत ठरला आहे. राहुल गांधीच्या पदयात्रेचा परिणाम दिसेल, असं बऱ्याच लोकांच भाकीत होतं. पण ते फक्त काँग्रेस पुरतं आहे, असं एकंदरीत चित्र आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचा पुन्हा एकदा करिष्मा पाहायला मिळाला आहे. काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपाने दीडशे पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरुवात केली आहे. यानुसार भाजप सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणार आहे. तर, कॉंग्रेसला आतापर्यंत 19 जागा मिळाल्या आहेत. तसेच, आपला केवळ सहा जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी