काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यात आली आहे. गुजरात कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे आता राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार आहे. यासाठी त्यांना केवळ लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज करावा लागणार आहे.
काय म्हणाले सुप्रीम कोर्ट
या खटल्यात सर्वोच्च शिक्षा देण्यात आली होती. एवढी सर्वोच्च शिक्षा देण्याची काय गरज? एवढी कठोर शिक्षा का? हे न्यायाधीशांनी सांगायला हवं होतं. हा खटला अदखल वर्गात येतो. राहुल यांचे वक्तव्य योग्य नव्हतं. सार्वजनिक जीवनात राहुलकडून जबाबदारीची अपेक्षा. हे फक्त राहुल गांधींच्या अधिकाराचे प्रकरण नाही.