आमच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांवर थोबाड उघडत बसलेला. म्हणे बावनकुळे ही वाया गेलेली केस आहे. या ढाकणढुऱ्या संजय राजाराम राऊतच्या कुटुंबीयांना विचारलं किंबहूना राजाराम राऊत आज जिवंत असते तर हा बाद झालेला त्यांचा मुलगा जो समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शक्ती कपूरचा रोल जो हिंदी चित्रपटमध्ये करायचा त्या रोलमध्ये आता आयुष्य जगतोय. म्हणे कामटी विधानसभामध्ये भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झाली. आज संजय राजाराम राऊत ज्या वॉर्डमध्ये राहतो भांडूपमध्ये त्या वॉर्डचा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा आहे आणि दुसऱ्या लोकांवर टीका करतो आणि महिलांचे अत्याचार, महिलांवर बलात्कार, पोलिसांवर दबाव यावर बोलण्याची नैतिकता हा दाखवू शकतो का? आज त्या डॉ. पाटकर महिलेला ज्या पद्धतीने हा रोज छळतोय, तिच्या घरावर रोज दारुच्या बोटल मारल्या जातात, तिला धमकावलं जातं, तिला आयुष्यामध्ये संपवून टाकू असे ह्याचे लोकं तिला फोन करतात. आता तर त्या डॉ. महिलेनी आदरणीय देवेंद्र फडणवीसजींवर आरोप करावे अशा पद्धतीचा हा दबाव हा संजय राजाराम राऊत हा तिच्यावर टाकतोय. हे खरं आहे का खोटं आहे हे त्यानी सांगावं महाराष्ट्राला असे नितेश राणे पत्रकार परिषदमध्ये म्हणाले.
मी अत्यंत जबाबदारीने एक माहिती देईन, एनसीपीसीआर नावाची लहान मुलांचे संरक्षणासाठी बनवलेला आयोग आहे. एनसीपीसीआरकडे आदित्य ठाकरे संदर्भात लहान मुलांच्या छळण्याबाबत 3 तक्रारी दिल्या आहेत की नाही याचा खुलासा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी करावं. आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे? उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आदित्या ठाकरे आणि 3 लहान मुलांबाबत 3 केसेस त्यांनी दाबल्या. काय कारण होतं?
आता बदलापूरमध्ये जी काही घटना झाली आणि त्याबाबत आमचा सरकार कुठलाही दयामाया न दाखवता आरोपीवर किंबहूना कडक शिक्षा किंवा फाशी झालीच पाहिजे या भूमिकेवर आम्ही सर्वजण ठाम आहोत आणि त्या पद्धतीची कारवाई सुरु आहे. पण या उद्धव ठाकरेंचं सरकार असताना ते स्वतः मुख्यमंत्री असताना खुद्द स्वतःच्या मुलाने लहान मुलांसंदर्भात केलेल्या घाण कृत्यबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः माहिती दिली नाही तर मी या तीनही केसेस संदर्भात या एनसीपीसीआरकडे आहेत त्याबद्दल स्वतः पत्रकार परिषद घेऊन या महाराष्ट्राला माहिती देणार. नाहीतर त्या लहान मुलांचा पालकांचा मोर्चा मी स्वतः मातोश्रीवर काढीन आणि आम्हाला आदित्य ठाकरेकडून संरक्षण द्या अशी मागणी मी करीन असे नितेश राणे पत्रकार परिषदमध्ये म्हणाले.