प्रा. साईबाबा यांच्यासह हेम मिश्रा, महेश तिर्की, विजय तिर्की, नारायण सांगलीकर, प्रशांत राही आणि दिवंगत पंडू नरोटे या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन जन्मठेपेची शिक्षा झालेल्या प्रा. साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची नुकतीच मुंबई हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात जी एन साईबाबांसह त्याच्या इतर सहकाऱ्यांना निर्दोष ठरवत कारागृहात बंद असलेल्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून आज जी. एन. साईबाबा आणि त्याच्या इतर चार सहकाऱ्यांना निर्दोष ठरवत आज त्यांची सुटका करण्यात आली आहे.
आज सकाळीच जी. एन. साईबाबा यांची सेंट्रल जेलमधून सुटका करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. जी. एन. साईबाबा यांचे वकील आणि कुटुंबीय आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करून न्यायालयाचा ऑर्डर जेल अधिकाऱ्यांपर्यंत आणू शकले नसल्याने काल त्यांची सुटका होऊ शकली नाही. मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेश द्वारावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले जी. एन. साईबाबा यांना वर्ष 2013 मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदा अक्काला भेटायला आलेल्या काही जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्राध्यापक जी.एन. साईबाबांचा नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. गडचिरोलीमध्ये काही जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी दिल्लीत साईबाबांच्या घरावर छापेमारी करत झडती घेतली. त्यात अनेक डिजिटल पुरावे मिळून आल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर साईबाबाला पोलिसांनी अटक केली होती.