राजकारण

Priyanka Chaturvedi : 50 खोक्यांसाठी आपला आत्मा विकलेल्यांनी मी कशी दिसते हे सांगू नये

शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले.

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. परंतु दोन्ही गट कायम एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असतात. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर भारतीयांची सभा घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली.

याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट म्हणाले की, 'प्रियंका चतुर्वेदी खरे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले होतं. ते असे म्हणाले होती की, ‘आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली’

यावर उत्तर देत प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, संजय शिरसाट यांचे महिलांबाबतचे विचार यातून दिसून येतात. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.

संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे. असे चतुर्वेदी म्हणाल्या.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती