Prithviraj Chavan Team Lokshahi
राजकारण

"राज्यात लवकरच ऑपरेशन कमळ" पृथ्वीराज चव्हाण यांचा लोकशाही मराठीवर खळबळजनक दावा

आता व्यक्तिगत कारणाने आमदारांनी राजीनामा केला. आणि पक्षांतर केले तर काही आश्चर्य वाटायची गरज नाही.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू असल्याच्याही बातम्या समोर आल्या. या सर्वादरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच ठाकरे गट नेते संजय राऊत आणि वंचित अध्यक्ष यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झालेला असताना आता लोकशाही मराठीशी बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. "राज्यात लवकरच ऑपरेशन कमळ होऊ शकतं" असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

लोकशाही मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये बोलत असताना चव्हाण म्हणाले की, पक्ष सदस्याच्या राजीनामा देऊन पक्षांतर करणे कुठलीही कायदेशीर बंदी नाही. परंतु, दोन तृतीयांश लोकांनी आपला वेगळा गट निर्माण करणं आपले सदस्त्व वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात शामिल होणे. त्याची मला शक्यता वाटत नाही. आता व्यक्तिगत कारणाने आमदारांनी राजीनामा केला. आणि पक्षांतर केले तर काही आश्चर्य वाटायची गरज नाही. त्यामुळे फार मोठे गणित बदलेल असं मला वाटत. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, 'आता तरी सुप्रिम कोर्टाने शिंदे गटाच्या सोळा आमदारांना निलंबित केले. त्यांना मंत्री होता येणार नाही कायद्यानुसार तर अशा परिस्थितीत देखील देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गट यांचेच बहुमत असेल. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बदलावा लागेल. पण आणखी संख्या वाढवण्यासाठी कदाचित ऑपरेशन कमळचा वापर करण्यात येऊ शकतो. त्यामध्ये काही आश्चर्य वाटायला नको.' असा दावा त्यांनी केला. 'काही लोक ज्यांची मजबुरी असेल तर ती लोक जाऊ शकतात. परंतु, कोण जाईल, कोणाची मजुबरी कोणावर ईडीचे खटले आहेत. त्यावर बोलताना येणार नाही. माझ्या दृष्टीने सुप्रिया कोर्टाचा निर्णय मोठा टर्निग पॉईंट ठरेल असे मला वाटत.' असे पृथ्वीराज चव्हाण लोकशाहीशी बोलताना म्हणाले.

Cyclone Dana : ओडिशामध्ये दाना वादळांचं भयानक संकट; ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट

देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींच्या भेटीला, 10 जागांच्या तिढ्याबाबत चर्चा?

Ravindra Dhangekar on Congress Candidate List | रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर, धंगेकर म्हणाले...

Congress Candidate List 2024: काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Delhi Mahayuti Meeting | दिल्लीतील चर्चा पूर्ण, उद्या मुंबईत अंतिम चर्चेची शक्यता | Marathi News