मुंबई : कॉंग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) भेटतात. पण, राहुल गांधी (Rahul Gandhi) हे चार वर्ष भेटलेच नाही, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी केले होते. यावर उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे.
राहुल गांधी केलेल्या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी पद सोडल्यापासून ते सक्रिय नव्हते. त्यात दोन वर्षे कोरोना होता. पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेत ते सहभागी होत नव्हते म्हणून चार वर्षे भेट झाली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
महापालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हा राज्यपातळीवरचा निर्णय असून स्थानिक पातळीवर हे ठरवायचं आहे. महाविकास आघाडी केली तर भाजपाचा सफाया होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दोन पक्षाचे सरकार चालवणे ही तारेवरची कसरत आहे. पण, पहिल्यांदा हा प्रयोग झाल्याने अडचणी होतात. तीन पक्षांचे सरकार चालवणे कठीण काम आहे. आणि त्यातही आम्ही कमी आहोत. महाविकास आघाडीमध्ये नाराजी वगैरे असे काही नाही. सरकार फडणवीस यांच्यापेक्षा चांगले असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
राज्यसभा उमेदवारीरविषयी बोलताना ते म्हणाले, मुकुल वासनिक यांना राज्यातून उमेदवारी द्यायला हवी होती. ते राज्याच्या हितासाठी विदर्भात कनेकत राहिले असते. माझी नाराजी कुठेही नाही. सहा जागणासाठी सात उमेदवार आहे. एकाला पराभूत व्हावे लागेल.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काश्मीरची परिस्थिती गंभीर होत आहे. पण, जादूची कांडी कोणाच्याच हातात नाही. फिरवली की व्यवस्थित होईल. काश्मीरमध्ये हळूवारपणे चर्चा करून विरोधकांना एकत्र घेऊन निर्णय घ्यायला हवं, असे सल्ला त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.
मोदी सरकारवर टीका पृथ्वीराज चव्हाण म्हंटले, काश्मिरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून काश्मिरमध्ये टार्गेट किलिंग सुरू आहे. चीनने रस्ते बांधायला सुरुवात केली आहे. आपले सैनिक मारले जात आहेत. तर, अमित शहा यांना परिस्थिती सांभाळण्यात अपयश येत असून परराष्ट्र धोरण चुकत आहे, असे सांगितले.