मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांकडून मणिपूरचा प्रश्न घेण्याबाबत अध्यक्षांकडे बोलायला थोडावेळ मागितला पण अध्यक्षांनी हा प्रश्न मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ही घटना 4 मे रोजी घडली. या घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातून पंतप्रधानांच्या कार्यालयात गेली. पंतप्रधानांचा अतिशय महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय दौरा होता. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ताबडतोब इंटरनेट बंद केलं. त्यामुळे ही घटना कुणाला कळली नाही.
तसेच कुणीतरी ती क्लिप बाहेर आणली. दडपून टाकण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला गेला. मोदी अडीच महिने यावर काहीच बोलले नाही. हा प्रश्न विधानसभेत घेण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांना काहीही हरकत नव्हती. यावर मोदींना अडीच महिन्यानंतर बोलावं लागलं. असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.