विकास माने | बीड: बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतोय. तत्पूर्वी खासदार डॉ.प्रीतम मुंडे या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या आहेत. गोपीनाथ गड ते सावरगाव घाट या रॅलीला सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने या रॅलीत मुंडे समर्थक आणि भगवान बाबाचे भक्त सहभागी होतील.
आज राज्यात 4 मेळावे:
सकाळी साडेसात वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथे मेळावा
दुपारी 12 वाजता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे मेळावा
माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर मेळावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी येथे मेळावा
शिवसेनेचे दोन्ही मेळावे चर्चेत:
राज्यातील राजकीय क्षेत्रांत भुकंप झाल्यानंतर शिवसेना पक्ष कोणाचा या वादानंतर दसरा मेळावा कोण घेणार यावरूनही राजकारण झालं. अखेर आज उद्धव ठाकरे व शिंदेगट हे दोन्ही पक्ष दसरा मेळावे घेत आहेत. दोन्ही गटांकडून शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, संपुर्ण राज्याचं या मेळाव्यांकडे लक्ष लागून आहे.