मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात अटल सेतू प्रकल्पाचे शुक्रवारी, १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेले. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. या वेळी निमित्त सोलापुरातील कामगार वसाहतीच्या उद्घाटनाचं आहे. कामगारांचे शहर अशी सोलापूरची ओळख आहे. गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो.
मात्र संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घर स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारत आहे. या वसाहतीच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार असल्याची माहिती मिळत आहे. 350 एकर परिसर, 834 इमारती , 30 हजार फ्लॅट्स ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे.
दरम्यान, पाच वर्षानी पुन्हा नरेंद्र मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात येणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेल्या रे नगरचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आल्याने सर्वच लोकार्पण सोहळ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. येत्या काही दिवसात आपल्या घराच्या चाव्या मिळणार असल्याने कामगारांना देखील मोठा आनंद आहे.