राजकारण

मनसे व शिंदे भाजप महायुती होणार? प्रवीण दरेकर म्हणाले, मने जुळलेलीच पण...

राज्यात मनसे, भाजप-शिंदे गट महायुतीत दिसणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. यावर आज प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दिपोत्सवानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले होते. यावरुन राज्यात मनसे, भाजप-शिंदे गट महायुतीत दिसणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. अशातच मनसे आमदार राजू पाटील यांनीही संकेत दिले होते. यामुळे आगामी निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असल्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत. यावर आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो. हिंदुत्त्ववादी पक्ष आहे. मनसेने हिंदुत्ववादी भूमिका अधोरेखित केलेली आहे. यामुळे कार्यकर्त्यांची मने जुळलेलीच आहेत. पण, निर्णय कार्यकर्ते नव्हे तर नेते घेतात, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, दिवाळीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिंदे सरकार बरखास्तीची मागणी करणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटले होते. या विधनावर प्रवीण दरेकरांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे. नानांची कीव करावीशी वाटतं. बालिशपणाचे व अपरिपक्व वक्तव्ये येते. निवेदन देऊन सरकार बरखास्त होत नसतं. हे नानांसारख्या नेत्यांना माहिती असावं. सनसनाटी व अपरिपक्व बोलणं नानांचा स्वभाव झाला आहे, असा टोला त्यांनी नाना पटोलेंना लगावला आहे.

राज्यात पावसांनी धुमाकूळ घातला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यालाही आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, सरकार संवेदनशील आहे. त्यांच्या भावना त्यांनी मांडल्या आहेत. त्यांची दखल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेतील.अडीच वर्षात केंद्रातून पैसे येऊन गेले. अनेक प्रस्ताव तर पाठवलेच नाही. पण, आता डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे कामे होणार, असेही दरेकरांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सत्तांतरानंतर राज ठाकरे व शिंदे-फडणवीस यांच्यातील जवळीक वाढताना दिसत असून अनेक कार्यक्रमांनिमित्ताने ते एकत्र दिसत आहेत. अशातच, राजू पाटील यांनी राज ठाकरेंनी सांगितले भविष्यात आपल्याला युती सोबत जायचंय, तर आम्ही त्यालाही तयार आहोत. मात्र एक निश्चित, इथे आमची मनं जुळली आहेत. वरून तारा जुळल्या की सगळे जुळून येईल, असे सूचक विधान केले होते. तर, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानावर भेट घेतली आहे. यामुळे पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाणा आले आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय