राजकारण

Manipur Incident : मोदी जेव्हापासून या देशात आलेत तेव्हापासून महिलांच्या विरोधात...; - प्रणिती शिंदे

मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, काल जो व्हिडिओ व्हायरल झाला तो अंगावर शहारे आणणारा होता. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. जेव्हापासून मोदीजी या देशामध्ये आले तेव्हापासून त्यांची जी विचारसरणी आहे. जी महिलांच्या विरोधातली विचारसरणी आहे. हा फक्त मणिपूरचा विषय नाही आहे तर हा देशाच्या प्रतिमेचा विषय आहे. संसदेत मोदी या विषयावर बोलायला तयार नाही आहेत. विधानसभेत आम्ही या विषयावर बोलायला थोडावेळ मागितला. तर त्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी