राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार का फुटलं याचं कारण प्रकाश महाजनांनी बोलून दाखवलं, तसंच एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं असता त्यावर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे यांच्यावरबी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे. दरम्यान बोलताना त्यांनी सरकारवरही टीका केली.
उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले प्रकाश महाजन?
"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची किंमतच माहित नाही... येवढं मोठं बंड होतंय हे तुम्हाला कळालं नाही म्हणजे, तुम्ही राज्य करायच्या लायकच नव्हते. 40 आमदार तुम्हाला सोडून जातात म्हणजे तुम्हाला आत्मपरिक्षणाची गरज होती. पण, दसऱ्याच्या मेळाव्यात ते आत्मपरिक्षण झाल्याचं दिसलं नाही. ज्या लोकांनी तुमच्या वडिलांसोबत काम केलं, ज्यांनी तुमच्यासोबत काम केलं ते निघून गेले." अश्या शब्दात महाजनांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
आदित्य ठाकरेंची राजकीय अक्कल शुन्य:
"आदित्य ठाकरेची राजकीय अक्कल शुन्य आहे. त्यांनी परवा एक अत्यंत वाईट विनेद केला, 'कोण बाळासाहेब? बाळासाहेब थोरातांची सेना आहे का?' असं आदित्य म्हणाला. अरे बाबा तू ज्यांचा नातू आहेस त्याच बाळासाहेबांची सेना ओळखली जाते. या अश्या लोकांना नेता कसं मानतील लोक?" अशी खरमरीत टीका महाजनांनी आदित्य ठाकरेंवर केली.
दसरा मेळाव्यातून जनतेला काहीही मिळालं नाही:
"दसरा मेळाव्यामध्ये दोन्ही गटांकडून केवळ वस्त्रहरण झालं. केवळ टीका आणि प्रतिटीका पाहायला मिळाली. मात्र, जनतेच्या हाती काय आलं?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.