चंद्रशेखर भांगे | पुणे : पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीवर तब्बल ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी झाले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अशातच, आता प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदींनी आरोपांबाबत गुन्हा दाखल करावा अन्यथा 10 दिवसात माफी मागावी. नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 27 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये बोलताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्र सहकारी बँक तसेच सिंचन व खननंमध्ये 70 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला. देशातील सर्व यंत्रणा यांच्याकडून पडताळणी करूनच त्यांनी हे आरोप केले असतील. पण, आज एक महिना झालं तरी कुठलीही कारवाई नाही. 1990 साली राज्यसभेत मी गेल्यावर काँग्रेसचे सरकार होत आणि तेव्हा त्यांनी एमटीएनएलमध्ये घोटाळा झालं असं सांगितलं आणि निष्पन्न काहीच झालं नाही पण ज्यांच्यावर आरोप झाला त्यांचं राजकीय कारकीर्द संपली. आणि आत्ता मागच्या 10 वर्षात भाजपकडून देशातील अनेक लोकांवर आरोप झाले. त्यांच्यावर ईडीची रेड झाली. एफआयआर झाली आणि अटक देखील झाली पण आरोप सिद्ध झाले नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
राज्यात कसं राजकारण चालला आहे हे आपण पाहात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आरोप केलं आहे. त्याबाबत भाजप आणि त्यांनी 10 दिवसात गुन्हा दाखल करावा आणि जर राजकीय विधान केलं असेल तर त्याने एका पक्षाचं विनाश करण्याचं ठरवलं आहे. जर असे नाही नसेल तर पंतप्रधानांनी शरद पवार आणि जनतेची माफी मागावी. 10 दिवसात माफी मागितली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. तसेच या आंदोलनात काँग्रेस आणि शिवसेना यांना देखील सहभागी करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.