औरंगाबाद : शिवसेना आणि वंचितच्या युतीबाबत आज प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्त्र डागले. वंचित आणि शिवसेनेची युती पडद्यावर उद्धव ठाकरे म्हणाले तर येईल, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, काँग्रेसने कुणाला फसवले नाही? काँग्रेस सर्वांना वापरत आली आहे, असा आरोपही आंबेडकरांनी केली आहे.
वंचित आणि शिवसेनेची युती पडद्यावर उद्धव ठाकरे म्हणाले तर येईल. मनपाच्या निवडणुकीसाठी बोलणं सुरू आहे. काँग्रेसवर भरोसा ठेवू नका. आम्ही स्वतंत्र जाणार हे काँग्रेसच्या बैठकीत क्लिअर करणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण खोटारडा नंबर एक आहे. आम्ही हरलेल्या जागा मागत होतो. मात्र, त्या जागा काँग्रेस, राष्ट्रवादी सोडायला तयार नव्हत्या. तुम्ही फक्त दलितांपुरते मर्यादित रहा असे सांगितले होते.
ओबीसी आणि गरीब मराठा काँग्रेसला चालत नाही. त्यामुळे आमची युती झाली नाही. ते निवडणूक जवळ आल्यास कॉल घेतील. काँग्रेसने कुणाला फसवले नाही? काँग्रेस सर्वांना वापरत आली आहे, असा जोरदार हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसवर केला आहे.
एमआयएमच आम्हाला स्पष्ट होते की मुस्लिम मते येतील यात साशंकत आहे. एमआयएमने 100 जागा मागितल्याने युती घडू शकली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे. हे निजामी मराठे, आजची रेव्हेन्यू सिस्टम छत्रपती शिवाजी महाराजांनी डेव्हलप केलेली आहे. हा लढा रयतेचा विरुद्ध निजामी असा आहे. राष्ट्रवादीच्या मतावर मी न बोललेलं बर याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारावं, असे त्यांनी म्हंटले आहे.
इतर पक्षांच्या खेळामुळे आम्हाला शिक्षक निवडणुकीत जिंकण्याचे जास्त चान्स आहेत. बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील अशी निवडणूक लढवावी. भाजपचा नवा चेहरा राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतात. राज्यात सुरू असलेल्या खेळीमुळे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचा मोठा चेहरा पाहायला मिळेल, असेही आंबेडकरांनी सांगितले आहे.