जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळी पडून वेगळा निर्णय घ्या तर आमदार पाडू असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. ओबीसींमध्ये सरकारचे आमदार पाडण्याची ताकद आहे असं शेंडगे म्हणाले. आमचे आमदार निवडून आणून आमचं सरकार स्थापन करु असंही शेंडगे म्हणाले आहेत. तर ओबीसी आरक्षणासाठी आता रस्त्यावरची लढाई लढू असंही शेंडगे यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे लोकसभा निवडणूकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिला होता ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा आणि त्यानुसार राज्यामध्ये महायुतीची ताकद कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता विधानसभा निवडणूकीमध्ये ओबीसी नेत्यांकडून हा इशारा दिला जात आहे.