निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. सक्रीय राजकारणातून कायमचा बाजुला होत असल्याचे ट्विट करत कार्यकर्त्यांना त्यांनी माहिती दिली होती. अशी पोस्ट त्यांनी त्यांच्या सोशल मीडीयावर शेअर केली होती.
त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर निलेश राणे यांनी त्यांच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.
निलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर सिंधुदुर्गात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरवर टायगर इज बॅक असा उल्लेख करण्यात आला आहे.