Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

बंडखोर शिवसेना आमदारांची बिले भाजप देतंय?

16 बंडखोर आमदारांना नोटीस

Published by : Shubham Tate

eknath shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एकीकडे उद्धव ठाकरे स्वत: मंथनासाठी उतरत आहेत तर दुसरीकडे भाजपही सक्रिय झाला आहे. दरम्यान, आसाममध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत असलेले एकनाथ शिंदे यांनी 38 आमदारांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. त्यांच्या एका समर्थक आमदारानेही नवी शिवसेना स्थापन करण्याचा दावा केला आहे. (political crisis bjp shivsena meeting eknath shinde uddhav thackeray)

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटीमध्ये तळ ठोकलेल्या महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमदार ज्या आलिशान हॉटेलमध्ये राहतात त्यासाठी भाजप पैसे देत नाही. असा खुलासा त्यांनी केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती लवकरच 16 बंडखोर आमदारांना नोटीस बजावू शकतात, ज्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटिस तयार असून त्या लवकरच आमदारांना पाठवल्या जाऊ शकतात. अपात्रतेची कारवाई करता येईल का, याबाबत कायदेशीर मत मागवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील राजकीय गोंधळात ठाकरे सरकार पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले आहे की आम्ही आमच्या बॅगा पॅक करून तयार बसलो आहोत. ते म्हणाले की, आपण मंत्री होऊ असे कधीच वाटले नव्हते. पवार साहेब सत्तेत आले आणि आम्ही मंत्री झालो. मंत्रीपद हे कायमस्वरूपी नसते. आज असो वा उद्या, मंत्रिपदावरून पायउतार होण्याची वेळ आली आहे, काहींसाठी ती 5 वर्षांनी आली आहे, आमच्यासाठी ती अडीच वर्षांनी आली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result