कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. बोगस प्रतिज्ञा पत्रांचा तपास आता मुंबई पोलिसांनी सुरु केला आहे. ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरातून सादर केलेली प्रतिज्ञापत्र तपासणीसाठी मुंबईचे पथक कोल्हापूरात दाखल झाले आहे.
शिवसेना पक्षाच्या नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाने दावा दाखल केला होता. याप्रकरणी निवडणूक आयोगाने ठाकरे व शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. यासाठी जिल्ह्यानुसार करण्यात आली. यानुसार मुंबई क्राईम ब्रांचचे एक पथक कोल्हापुरात आले असून याची माहिती घेत आहेत. चार अधिकाऱ्यांचे पथक असून पोलीस मुख्यालयात माहिती घेतली.
ठाकरे आणि शिंदे गटाने शिवसेना नावावर तसेच धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. यासाठी जिल्ह्यानुसार पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र पाठवली होती. दरम्यान ठाकरे गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र (अपेडेव्हीट) सादर करण्यात आल्याची तक्रार दाखल झाल्याने मुंबई क्राईम ब्रँचचे एक पथक कोल्हापुरात आले असून, याची माहिती घेत आहेत. पोलीस मुख्यालयात या पथकाने माहिती घेतली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याची अनेक शपथपत्र मुंबईत एकाच ठिकाणी आढळून आली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून ही सर्व शपथपत्रे बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर आता या प्रकरणावर गुन्हे शाखा तपास करत आहे. या तपासातून काय खुलासा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.