आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 22 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. संसदेच्या 19 दिवसांच्या या अधिवेशनात 15 बैठका होणार असून 37 विधेयके मांडली जाणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे. अधिवेशन काळात 15 बैठका होणार. 4 राज्यातील विधानसभेचे निकाल उत्साह वाढवणारे आहेत. जनादेशानंतर आपण संसदेच्या नव्या मंदिरात शिरतोय. देशाने नकारात्मकतेला नाकारलं.
कुठेच सरकारविरोधी लाट नाही. संसदेत विधेयकांवर चांगली चर्चा व्हावी. सर्व खासदारांनी चांगली चर्चा करावी. विरोधकांनी सकारात्मक विचार ठेवून संसदेत यावं. बाहेरच्या पराभवाचा राग विरोधकांनी संसदेत काढू नये. संसदेचे अधिवेशन विरोधकांसाठी सुवर्णसंधी आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.