राजकारण

'देशहिताचे मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद भाजपमध्ये असल्याने लोकांनी मतदान केले'

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. भारतीय जनता पक्षाचा थेट विजय झाला नाही, तिथे भाजपची मतांची टक्केवारी ही जनतेच्या आपुलकीची साक्ष आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी गुजरात, हिमाचल आणि दिल्लीच्या जनतेचे आभार मानले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्वप्रथम मी जनतेसमोर नतमस्तक होतो. जनतेचे आशीर्वाद मोठे आहेत. जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी केलेले कष्टांचा आज सर्वत्र अनुभव आला. भाजपला वाढता पाठिंबा दर्शवतो की कुटुंबवाद आणि भ्रष्टाचाराविरोधात जनतेमध्ये रोष वाढत आहे.

गुजरातच्या जनतेने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गुजरातच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. भाजप हा गुजरातमधील प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक घराचा भाग आहे. भाजपला मिळालेला जनसमर्थन हे नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाजपला मिळालेला जनसमर्थन हे भारतातील तरुणांच्या 'तरुण विचारसरणी'चे प्रतिबिंब आहे. भाजपला मिळालेला जाहीर पाठिंबा म्हणजे गरीब, शोषित, वंचित, आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी मिळालेला पाठिंबा आहे. प्रत्येक गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबाला लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. देशाच्या हिताचे सर्वात मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद भाजपमध्ये असल्याने लोकांनी भाजपला मतदान केले, असेही त्यांनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले की, गुजरातमध्ये भाजपला आदिवासी समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. एसटीसाठी राखीव असलेल्या 40 जागांपैकी भाजपने 34 जागांवर प्रचंड बहुमत मिळवले आहे. भाजपला आदिवासींचा मोठा पाठिंबा मिळत आहे. कारण अनेक दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या त्यांच्या आकांक्षा भाजप पूर्ण करत असल्याचे आदिवासींना दिसत आहे. भाजपने आदिवासी अध्यक्ष निवडले. भाजपने आदिवासींसाठी अनेक धोरणात्मक उपक्रम आणले आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. राज्यातील 182 जागांपैकी भाजप 156 जागांवर विजयी झाली आहे. तर काँग्रेसने केवळ 17 जागा जागा मिळवल्या आहेत. आम आदमी पार्टी 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर इतरांना चार जागा मिळल्या आहेत. तर, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत 40 जागा मिळवल्या आहेत. भाजपला 25 जागा तर, 3 जागा अपक्षांना मिळाल्या आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव