संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 22 सप्टेंबरपर्यंत अधिवेशन सुरु राहणार आहे. या अधिवेशनात 'वन नेशन वन इलेक्शन' आणि देशाचे नाव 'इंडिया' वरुन 'भारत' करण्याचा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची बैठक 19 सप्टेंबरलाच नवीन इमारतीत होणार असून तिथे 20 सप्टेंबरपासून नियमित कामकाज सुरु होणार आहे.
यादरम्यान सभागृहाचं कामकाज सकाळी 11 ते दुपारी 1 मग दुपारी 2 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहिल. या अधिवेशनाची सुरुवात जुन्या संसद भवनात होणार आहे. अधिवेशनाची बैठक 19 सप्टेंबरलाच नवीन इमारतीत होणार असून तिथे 20 सप्टेंबरपासून नियमित कामकाज सुरु होणार आहे. पोस्ट ऑफिस विधेयक 2023 आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयके राज्यसभेत मांडली जातील.