राजकारण

कोणाच्या खांद्यावर बंदूक चालवण्याचे काम नाही; पंकजा मुंडे आक्रमक, अमित शहांना भेटणार

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथी निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तोफ धडाडली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बीड : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आज नववा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तोफ धडाडली आहे.

मी अनेकवेळा माझी भूमिका मांडली आहे. ती भूमिका मी परत मांडावी एवढे लेचेपेचे माझे शब्द नाहीत. माझे शब्द ठाम आहेत. माझ्या डाव्या बाजूला प्रचंड मोठी कमळाची आकृती आहे, त्यामध्ये माझे पिता गोपीनाथ मुंडे विसावले आहेत, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

मी राजकारणात लोकांसाठी आहे. माझ्या घरच्यांसाठी नाही. मला परळीत पराभव स्वीकारावा लागला. मला सहज काहीच मिळालं नाही. मला भूमिका घ्यायची असेल तर तुमच्या समोर घेईल. कोणाच्या खांद्यावर बंदूक चालवण्याचे काम नाही. जी राजकारणात भूमिका घेईल छातीठोक घेईल. अमित शहा यांना वेळ मागितला असून त्यांना मी भेटणार आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news