राजकारण

प्रीतम मुंडेंच्या जागेवर निवडणूक लढवणार नाही; पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा आज समारोप परळीत झाला. यावेळी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा आज समारोप परळीत झाला. यावेळी खासदार प्रीतम मुंडेंच्या जागेवर निवडणूक लढवणार नाही, अशी स्पष्टोक्ती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे यांना लोकसभेची ऑफर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागेवर निवडणूक लढवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली. मी कुणालाही डायरेक्ट घरी बसून असा निर्णय घेणार नाही. जगात कुठेही निवडणूक लढवेल. पण, मी प्रीतम ताईंना उचलून निवडणूक लढवणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. खासदार की आमदार की संदर्भात बोलण्यात मात्र त्यांनी नकार दिला. या भाषणावेळी पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले होते.

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडेंही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने परळीतील जागेचा पेच निर्माण झाला आहे. तर, पंकजा मुंडे यांनी राजकारणातून ब्रेक घेतल्यानंतर कमबॅक करत शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली होती. या यात्रेतून अनेकदा पंकजा मुंडेंनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. अशातच, पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी