भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. 'भगवान बाबा की जय' अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
या दसऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी गर्दीचं सीमोल्लंघन केलं. यासाठी सर्वांचे आभार.
माझ्या मेळाव्यात कोण घुसलं. माझा आवाज कुणीही दाबू शकणार नाही.
शिवशक्ती परिक्रमा भव्य करण्याचं काम माझ्यावर आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेनं केलं आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर. ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित होत असताना या सरकारकडून आणि नेत्यांकडून समाजाला खूप अपेक्षा आहे
या अपेक्षा भंग होणं आता जनतेला सहन होणार नाही.
राजकारणात माझा पाय मोडला तर, मला कुबड्या घेऊन चालावं लागतं. मला माझ्या लोकांनी कुबड्या दिल्या आणि मी मॅरेथॉन धावण्यासाठी तयार झाले.
माझ्या आयुष्यात मी निवडणूक हरली असले तरी तुमची मान खाली जाईल असे काम मी करणार नाही.
माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीत जाऊन बसणाऱ्यांचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही.
माझ्या कारखान्यावर छापेमारी झाली त्यावेळी तुम्ही दोन दिवसात 11 कोटी तुम्ही जमा केले.मी लोकांचे पैसे घेतले नाही, माझ्या लोकांचे आर्शिवाद पुरेसे आहेत. तुम्ही जमा केलेले पैसे मी घेणार नाही, असे मी मझ्या मुलाला सांगितलं.
मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मी माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी तुमचे उपकार कधीच फिटू शकणार नाही.