संसद परिसरात विरोधकांकडून मोदी सरकारचा निषेध करण्यात येत आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर काळे कपडे घालून विरोधकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यात ठाकरे गटाचे खासदार देखिल सहभागी झाले आहेत.
मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करा, ठोस निर्णय घ्या अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक पाऊले उचलत आहेत. मणिपूरमधील महिलांवर अत्याचार केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधक भाजपावर टीका करत आहेत. याचे पडसाद संसदेतही उमटत आहेत. संसदेत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले असून या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका घेतली आहे.