राजकारण

Ambadas Danve: विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबन

अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबन करण्यात आलं आहे.

Published by : Dhanshree Shintre

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबन करण्यात आलं आहे. विधानपरिदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काल सभागृहात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी भाजपचे पक्षनेते प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

विधिमंडळाच्या इतिहासात विरोधी पक्षनेत्याचं पहिल्यांदाच निलंबन झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवीगाळ प्रकरणात उपसभापतींकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विरोधकांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आलं आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर सभागृहात गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश