महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य लाभणार आहे. या योजनेसाठी राज्यातील हजारो महिलांन आपले अर्ज दाखल केले आहेत. सरकारकडून जाहीर केलेल्या या योजनेवर विरोधकांकडून प्रचंड टीका करताना पहायला मिळत आहे. या टीकेवरुनच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. कोणी कितीही काहीही अपप्रचार केला तरीही राज्यातील कोट्यावधी महिलांना दोन हप्ते मिळणार आहेत, असं म्हणाले आहेत. परभणी शहरातील राजलक्ष्मी लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस कडून माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महिला मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात ते बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, विरोधक काहीही अप्रचार करत असले तरी ही योजना कायमस्वरूपी चालणार असून राज्यातील कोट्यावधी जनतेला या महिन्यात हप्ता दोन हप्ते मिळणार आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरीही काही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितल आहे.
पुढे त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली. यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटरवरुन दिली. महिलांच्या बँक खात्यात पाठविण्यात आलेली 1 रुपयांची रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, अशी विनंती देखील आदिती तटकरे यांनी केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 तारखेला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ 17 ऑगस्टला पुण्यातून होणार आहे.