बोगस बीयाणांच्या संदर्भात किती जणांवर कारवाई केली याची माहिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता खते आणि बोगस बियाणांच्या मुद्यांवरुन विरोधकांचा सभात्याग केला आहे.
यावरुन बोगस बीयाणांच्या बाबतीत कारवाई करण्यासाठी समिती कठीण केलेली आहे. आता बीटी कॉटन प्रमाणे कारवाई केली जाणार. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होते हे मी मान्य करतो, पण आता त्यासाठी आपण कायदा आणत आहोत. गुन्हा केला तर 500 रुपयांचा दंड आहे. दुसऱ्यांदा गुन्हा केला तर एक हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतरही गुन्हा केला तर परवाना रद्द. असे केलेलं आहे.
बोगस बियाणांच्या संदर्भात अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत धनंजय मुंडे यांनी असे म्हटले आहे.