एक देश एक निवडणुकासाठी आता समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. 2016 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात एक देश एक निवडणुकांसदर्भात उल्लेख केला होता. एक देश एक निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात महत्वाच्या पाच बैठका होणार आहेत.