लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची नितीशकुमार यांना ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून राज्यसभेचे उपसभापती हरिवंश व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यामार्फत भाजपची नितीशकुमार यांच्याशी चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
नितीशकुमार यांनी अलीकडेच राजभवनात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. भाजपने नितीशकुमार यांना यापूर्वीही महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची ऑफर दिलेली होती; परंतु त्यावेळी नितीशकुमार राष्ट्रपतिपद किंवा उपराष्ट्रपतिपदावर अडून बसल्याची माहिती मिळत आहे.