राजकारण

रस्त्याला तडा गेला, खराब झाला तर मी बुलडोजर खाली टाकीन; नितीन गडकरींचा कॉन्ट्रक्टरला इशारा

वाशिम शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ चा लोकार्पण सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

वाशिम : मी सगळ्या कॉन्ट्रक्टरला सांगितला आहे की रस्त्याला तडा गेला, रस्ता खराब झाला तर मी बुलडोजर खाली टाकीन, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इशारा दिला आहे. यासोबतच नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे. वाशिम शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ चा लोकार्पण सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.

वाशिम जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी नेत्यांना माझी विनंती आहे की मी प्रेशर आणून ठेकेदारांकडून काम करून घेतो. मात्र, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला त्रास देऊ नका, अशी कान उघडणी नितीन गडकरी यांनी आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची केली आहे. मी भडवेगिरी केली नाही. मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयांपर्यंतची कामे दिली आहे. पण, एकही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याकरता माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

आज विदर्भातील चित्र बदलत आहे. या विदर्भातील नाव जगात पोहचले. विदर्भाची म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ओळख होती. हे चित्र बदलत असून आता प्रगती सील करून हे पुसायच आहे. विदर्भातील कामे जास्त प्रमाणात करणार असल्याचा विश्वास गडकरींनी दिली आहे. शेतकरी अन्नदाता झाला आता येणाऱ्या काळात विमानाचा इंधनदाता बनणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

माझ्या 45 वर्षाच्या आयुष्यात मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं आश्वासन देत नाही. आणि आतापर्यंत कोणताही पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही तुम्ही आश्वासन दिल आणि ते पूर्ण झालं नाही. राजकारणामध्ये खोटं बोलणार नाही. मी प्रचारात बॅनर, पोस्टर लावणार नाही, चहा, दारू पाजणार नाही, असेही नितीन गडकरींनी म्हंटले आहे.

45 वर्षापासून मी मंत्री आहे. पण, विमानतळावर मला घ्यायला कुत्रही येत नाही. सुरक्षा असल्यामुळे केवळ दोन पोलिस येतात. कोणी हार घेऊन येत नाही. फुला-हारात काही नाहीये, काम झाली पाहिजे, असेही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू