nitin gadkari | uddhav thackeray team lokshahi
राजकारण

नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य; भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही

मी मंत्री असताना मला बाळासाहेब ठाकरेंचे खूप सहकार्य मिळाले

Published by : Shubham Tate

nitin gadkari : राजकारण हा खेळ आहे, सरकार बनते पडते. येथे त्यांनी अटलबिहारी वाजपेयींचे प्रसिद्ध विधानाचीही आठवण करून दिली आहे. लोक येतात जातात, सरकार येतात जातात, पण देश तसाच राहतो. आपण सर्वांनी देशासाठी काम करायचे आहे, देशाला जगातील महासत्ता बनवण्यासाठी काम करायचे आहे, असे ते म्हणाले. नितीन गडकरी (nitin gadkari) पुढे बोलताना म्हणाले की, बघू पुढे काय होते?, MVA ही सोयीची युती होती, त्यात तडजोड होती. वरवर यात विचारसरणीच्या राजकारणाची चर्चा नव्हती. (nitin gadkari on political crisis mva uddhav thackeray)

शिवसेनेकडे हिंदुत्व विचाराचा राजकीय प्रवाह आहे, त्यामुळे ही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकारणात प्रत्येक गोष्ट वेळ आणि परिस्थितीवर अवलंबून असते. महाराष्ट्राच्या राजकीय जंजाळावर आपल्याच शैलीत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, कधी ऊन असते तर कधी सावली असते पण आपण थांबायचे नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, मी मंत्री असताना मला त्यांचे खूप सहकार्य मिळाले होते. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले तर माझ्यासारख्या व्यक्तीला आनंद होईल पण आता तशी शक्यता दिसत नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सेना भवनात दाखल झाले आहेत. त्यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. काही मिनिटापूर्वी मुख्यमंत्री पोहोचले आहेत. शिवसेनेशी (Shiv Sena) बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कार्यकारिणीच्या बैठकीत असा ठराव मंजूर होणार आहे. तसेच मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त देखील वाढवला आहे. दरम्यान, दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे शिवसेनेतून (Shivsena) आमदारांची इनकमिंग सुरुच असल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Shivsena Balasaheb Thackeray) असे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाचे ठेवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या नावाची अधिकृत घोषणा संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका