संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा आणि सिधी-सिंगरौली या दोन महामार्गांच्या रखडलेल्या कामांबद्दल बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी देशातील रस्त्यांच्या रखडणाऱ्या कामावर राज्यसभेत खंत व्यक्त केली आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, देशातील मुंबई - गोवा आणि सिधी-सिंगरौली या दोन महामार्गांची कामे अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. यामुळे नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष नापास होत असून हे काम काही केल्या पूर्ण होत नाही आहे.
तसेच मुंबई - गोवा महामर्गाच्या रखडलेल्या कामावर पुस्तक लिहिता येईल. असे नितीन गडकरी म्हणाले. सिधी-सिंगरौली महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत 99 टक्के पूर्ण होणार. असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे.