nitin deshmukh : शिवसेनेचे अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख यांनी सुटका करुन पळून आल्याचा दावा खोटा असल्याचं बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. नितीन देशमुख इतर आमदारांसोबत चार्टर्ड विमानात बसलेले आणि विमानाबाहेरचे फोटो एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातून सही सलामत सुटलो, असं भाष्य करणाऱ्या नितीन देशमुखांचं बोलणं किती खरं, असाही संशय घेतला जातोय. (nitin deshmukh on eknath shinde bjp council)
देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर मतदान केल्याबरोबर गटनेते शिंदे यांनी गाडीत बसवून नेल्याचे सांगितले. सुरतमध्ये पोहोचल्यानंतर मी हॉटेलमधून बाहेर पडलो. जैन विद्यालयापर्यंत आलो. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माझ्या स्वीय सहाय्यकाला जागेची छायाचित्रे पाठवून सुटका करण्याची विनंती केली. त्याचवेळी माझ्या मागावर असलेल्या ३०-४० पोलिसांनी मला बळजबरीने उचलून रुग्णालयात नेले. मला हृदयविकाराचा धक्का बसला असल्याचे सांगून माझा घातपात करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मला पुन्हा हॉटेलला सोडले. त्यानंतर मी मवाळ होऊन शिंदे यांच्यासोबत राहिलो व गुवाहाटीपर्यंत पोहोचलो. तेथून गनिमी काव्याने मी माझी सुटका करून घेतली.
शिवसेनेच्या अंतर्गत बंडाचा थेट परिणाम पक्षाच्या खासदारांवरही होणार आहे. पण, सध्या महाराष्ट्रात अत्यंत नाट्यमय घटना होत असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत शिवसेनेच्या खासदारांची ‘’झाकली मूठ सव्वालाखाची’’ असेल. शिवसेनेचे लोकसभेत राज्यातून १८ तर, राज्यसभेत तीन खासदार आहेत. मुंबईबाहेरील शिवसेनेचे खासदार आतातरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असले तरी, अनेक खासदारांनी पक्षातील घडामोडींवर न बोलणे पसंत केले आहे. ‘’नजिकच्या भविष्यात काय होईल त्यावर आमचेही भविष्य ठरेल’’, असे सांगत खासदारांनी ‘’वेट अँड वॉच’’चे धोरण अवलंबलेले आहे.