राजकारण

सूर्याजी पिसाळ आज संजय राऊतांच्या रूपाने आलेत जन्माला; राणेंची जहरी टीका

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील संजय राऊतांच्या टीकेचा नितेश राणेंनी घेतला समाचार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकर मिरच्या झोंबतात. हे त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरसंधान साधले. या टीकेचा समाचार भाजप नेते नितेश राणे यांनी घेतला आहे. सूर्याजी पिसाळ आज संजय राऊतांच्या रूपाने जन्माला आला असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. दोन्ही मुलगे वाया गेलेले आहेत. म्हणून उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

छत्रपतींच्या विरोधात जाऊन मोगलांना जो मदत करत होता तो सूर्याजी पिसाळ आज संजय राऊतांच्या रूपाने जन्माला आला आहे. राऊत यांनी शिवसेनेच्या विरोधात जी भूमिका निभावली तीच भूमिका पिसाळने छत्रपतींच्या विरोधात निभावली होती, अशी टीका नितेश राणे यांनी राऊतांवर केली आहे.

कलंकित राजकारणावर बोलताना तुमच्या फॅक्ट्रीत शेणाची खाण आहे. त्याची माहिती पण द्या. कलंकित असलेला तुझ्या मालकाचा मुलगा कलंकित वाटत नाही का? उद्धव कलंकीत ठाकरे हे नाव आता तयार झाले आहे. दोन्ही मुलगे वाया गेलेले आहेत. एक दारू पिताना दिसला तर दुसऱ्यावर खुनाचा आरोप आहे म्हणून उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत.

दरम्यान, पुण्यात नितेश राणे यांच्या विरोधात तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत. तृतीयपंथीयांनी नितेश राणे विरोधात पुण्यात जोरदार आंदोलन केलं आहे. यावरही नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तृतीयपंथी समाजाने माझं वाक्य व्यवस्थित ऐकले नसेल. आदरणीय बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे त्याचा आधार घेऊन मी बोललो, असा दावा त्यांनी केला आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी