राजकारण

राऊत आणि उद्धव ठाकरेंवर आता राजकीय दुकान बंद करण्याची वेळ; कुणी केली टीका?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चेतन ननावरे | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. परंतु, उद्याच्या कार्यक्रमातील पवारांच्या उपस्थितीमुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होईल, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. पवारांच्या या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय दुकान बंद करण्याची वेळ आली आहे, अशी खरमरीत टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

नितेश राणे म्हणाले की, संजय राजाराम राऊत म्हणे आता पवारांनी संभ्रम निर्माण करू नये. संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांची आता राजकीय दुकान बंद होण्याची वेळ आली आहे. आमचं महायुतीचे सरकार आल्यामुळे राजकीय बेरोजगार झालेले संजय राऊत आणि त्यांचे मालक आता उद्या कुठल्या तोंडाने पुण्याच्या कार्यक्रमाकडे बघणार आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

संजय राऊत खूप हुशारक्या मारत बोलायचे पवार साहेबांना समजायला शंभर जन्म घ्यावे लागतील. पण, तुला व तुझ्या मालकाला या जन्मात तरी पवार साहेब कळले का? असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे. जर कळले असते तर भांडुपमध्ये शेंबड्या मुलासारखे नाक रगडत बसला नसता. आता लायकी ओळखा आणि मगच तोंड उघडा, असा घणाघातही नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शरद पवार या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जातवैधता प्रमाणपत्र वैध

Laxman Hake : ओबीसी समाज 'तुतारी'ला मतदान करणार नाही

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी बोलावली बैठक

तरुणाची हत्या करून अपघाताचा बनाव; दर्यापूर तालुक्यातील घटना, पाच जण पोलिसांच्या ताब्यात

भाजपची पहिली उमेदवारी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कुणाला मिळणार संधी?