राजकारण

नितेश राणेंनी राऊतांचा थेट बापच काढला; म्हणाले, कुठल्या....

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सिंधुदुर्ग : भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत मोठा आगलाव्या आहे. कुठल्या बापाचे नाव लावतोस हे संजय राऊतला विचारायचं आहे. कोणाचे बाप काढायचे, भांडण लावायचे, भावा भावात वाद लावायचे हे पहिल्यापासून त्याचे धंदे आहेत, अशी जोरदार टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.

संजय राजाराम राऊत हे पूर्ण नाव किती लोकांना माहिती आहे, असं मला महाराष्ट्राला विचारायचं आहे. कुठल्या बापाचे नाव लावतोस हे संजय राऊतला विचारायचं आहे. कोणाचे बाप काढायचे, भांडण लावायचे, भावा भावात वाद लावायचे हे पहिल्यापासून त्याचे धंदे आहेत. बाळासाहेब आणि मा साहेबांच्या वैयक्तिक संबंधांवर ही याने लोकप्रभात असताना प्रश्न विचारला होता. पवार कुटुंबियात ही भांडणे लावण्याचे काम सुरू केले आहे. हा याचा आताचा कार्यक्रम सुरू आहे. अजित पवारांनी याला खडसावले, शरद पवारही राऊतांना बोलले आहेत, अशी टीकास्त्र नितेश राणेंनी संजय राऊतांवर डागले आहे.

आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यातही याने वाद लावले आहेत. 1998 ला याने अस म्हंटलं होत की, जर मला खासदारकीची उमेदवारी दिली नाही. तर या बाप-लेकांना (बाळासाहेब-उद्धव) पोहचवतो. हा घरात घेण्याचे लायकीचा नाही. उद्धवजींना सांगेन, तुमच्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचे असेल तर याला लांब ठेवा, असा सल्ला राणेंनी उध्दव ठाकरेंना दिला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने तुम्ही फक्त 11 बाजार समित्यांवर निवडून आला आहात. तरीही भाजप एक नंबर वर आहे. म्हणून संजय राऊत उगाच बाता मारू नकोस, असे त्यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत मोठा आगलाव्या आहे. कालच ठाकरे गटाच्या काही लोकांनी मला फोन केला तुम्ही प्रेस घेऊन जे संजय राऊतला गेले तीन दिवस ठोकताय ते योग्य आहे. त्यामुळे आमची सकाळ फार चांगली जात आहे, असेही नितेश राणेंनी सांगितले.

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग