राजकारण

Maharashtra Political Crisis : अजित पवार यांच्यासह नऊ आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ

राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांंच्यासह नऊ आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यातील नावेही आता समोर आली आहेत.

राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि नेत्यांची आज अजित पवार यांच्या घरी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवनात दाखल झाले आहे.

अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्यासह दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, भाईदास पाटील, अनिल पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर, अजित पवार यांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर येत आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी