राजकारण

Nilesh Rane : निलेश राणे यांची राजकारणातून निवृत्ती

निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती

Published by : Siddhi Naringrekar

निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. सक्रीय राजकारणातून कायमचा बाजुला होत असल्याची ट्विट करत कार्यकर्त्यांना माहिती दिली आहे. भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. ही पोस्ट त्यांनी त्यांच्या सोशल मीडीयावर शेअर केली आहे. निलेश राणे यांनी पोस्ट करत म्हटले की, नमस्कार,मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'माझा बुथ, सर्वात मजबूत' अभियान

नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजाची गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांचा बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या

सिडकोच्या 26 हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ