Deepak Kesarkar  team lokshahi
राजकारण

मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नव्या नियुक्त्या जाहीर

दीपक केसरकर आता अधिकृतपणे मुख्य प्रवक्तेपदी, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शीतल म्हात्रे प्रवक्तेपदी

Published by : Shubham Tate

Eknath Shinde in Deepak Keskar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली. शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे. (New appointments announced by Chief Minister Eknath Shinde in Deepak Keskar)

तर आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे यांना देण्यात आली. तर बाकी शिलेदरांना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव