राजकारण

एकनाथ शिंदे गट महाराष्ट्रात 'गुंडाराज' आणू पाहत आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर साधला निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद दिवसेंन् दिवस वाढत आहेत. शिंदे गटाकडून मुंबई महानपालिकेतील शिवसेना कार्यालयावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे गट महाराष्ट्रात 'गुंडाराज' आणू पाहत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

क्लाईड क्रास्टो म्हणाले की, महाराष्ट्रात ईडी सरकार आल्यापासून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी कायदा हातात घेऊन लोकांवर हल्ला केल्याच्या किंवा कायद्याची आणि न्यायव्यवस्थेची भीती न बाळगता अवमानकारक विधाने केल्याच्या घटना घडल्या आहेत. मंत्री संतोष बांगर आणि दादा भुसे व्यक्‍तींना मारहाण करताना व्हिडीओमध्ये दिसले. अब्दुल सत्तार महिला खासदाराविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरताना दिसले, आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना विरोधकांविरोधात बळाचा वापर करायला सांगत आहेत, त्यातच शिंदे गटाच्या नगरसेवकांनी जबरदस्तीने मुंबई महापालिका मुख्यालयातील शिवसेनेचे कार्यालयताब्यात घेण्याचा मुद्दा ताजा आहे.

हे सर्व लोक लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे लोकशाही मूल्यांचे पालन करून इतर नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण करण्याऐवजी व लोकांची सेवा करण्याऐवजी ते स्वतःच कायदा हातात घेत आहेत. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाप्रमाणे त्यांनीही कायद्याचे पालन केले पाहिजे आणि न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे. मात्र, शिंदे गट 'दादागिरी करून आपला दबदबा निर्माण कराचा प्रयत्न करत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा मित्रपक्ष असलेला भाजप या मुद्द्यांवर गप्प बसून या गैरकृत्यांकडे डोळेझाक करत आहे. हे सगळं बघून आपल्या मनात एक प्रश्न येतो. एकनाथ शिंदे गट महाराष्ट्रात 'गुंडराज' आणू पाहत आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन पडले. या गटातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खरी शिवसेना नक्की कोणाची हा वाद सुरु असताना आता शिंदे गटाकडून मुंबई महानपालिकेतील शिवसेना कार्यालयावर कब्जा केला आहे. यामुळे पालिका मुख्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या आज महाराष्ट्रात सभा

Bacchu Kadu | देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा यांचा फेव्हिकॉलचा जोड : बच्चू कडू | Lokshahi News

Kasba Vidhan Sabha | सत्ताधारी पक्षाकडून धमक्या, मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांचा आरोप | Lokshahi

Ajit Pawar on Yugendra Pawar : साडेसहा लाख कोटींवर किती शून्य असतात हे तरी माहित आहे का? अजित दादांचा उपरोधिक टोला

Masoor Dal Face Pack: चमकदार, उजळ त्वचेसाठी मसूर डाळीच फेसपॅक वापरा; लगेचच रिजल्ट मिळवा