Sharad Pawar  Team Lokshahi
राजकारण

अंधेरी पूर्व विधानसभा लढणार की शिवसेनेला पाठिंबा? शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

Published by : Sagar Pradhan

राज्यात अभूतपूर्व गोंधळ घडल्यानंतर, आता निवडणूक आयोगाकडून सोमवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा दुबईत हदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप किंवा शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय परिस्थिती पाहता सर्वांचे लक्ष या निवडणुकीवर लागले आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची काय भूमिका असणार? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेला सहकार्य करणार असे स्पष्ट सांगितले आहे. यानंतर आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघात मतदान होईल. तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. एखाद्या आमदाराचा मृत्यू झाल्यास सहा महिन्यांच्या आत संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे गरजेचे असते. त्यानुसार निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आता शिवसेना आणि भाजपने आपले उमदेवार अगोदरच जाहीर केले आहेत. आधीही हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे या निवडणुकीसाठी शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार का, हेदेखील पाहावे लागेल.

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना

वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता केला खुला

Akola : अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन