राज्यात सध्यस्थितीत अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर वक्तव्यासोबत कृत्य देखील होत आहे. मात्र महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. त्यावरच आता राजकरण तापलेले असताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल. असे शरद पवार यावेळी म्हणाले.
नेमक काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्र- कर्नाटकमध्ये सध्या सीमावादावरून प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. येत्या 24 तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
कर्नाटकमधील बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले. या गाड्या रोखल्या. तसेच बेळगाव आणि इतर मराठी भाषिक परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातंय. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाला ज्यांनी संविधान दिलं. थोर महात्म्याच्या स्मरणाच्या दिवशी जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण काही आठवड्यापासून एका वेगळ्याच स्वरुपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी 23 नोव्हेंबरला जत संबंधी भूमिका मांडली. 24 नोव्हेंबरला अक्कलकोटबद्दल बोलले. फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी टीका त्यांनी केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही स्टेटमेंट सातत्याने केले आहेत. सीमा भागातील स्थिती गंभीर झाली आहे. माझा स्वतःचा अनेक वर्षांपासून संबंध आहे.हे चित्र घडत असताना दोन्ही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता होती. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याशी संपर्क साधला म्हणाले, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हे वेळीच थांबलं नाही परिस्थिती चिघळू शकते. येत्या 24 तासात वाहनांवरचे हल्ले थांबले नाहीत तर संयमाला रस्ता पहायला मिळेल, या स्थितीची जबाबदारी कर्नाटक सरकारवर असेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
अजूनही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका संयमाची आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच चिथावणीखोर भूमिका घेतली जातेय. सहकाऱ्यांकडून हल्ले घडत आहेत. देशाच्या ऐक्याला हा फार मोठा धक्का आहे. हेच काम कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सराकारला बघ्याची बूमिका घेऊन चालणार नाही, उद्यापासून केंद्र सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. महाराष्ट्रातील खासदारांना आम्ही सांगणार आहोत. केंद्रातील गृहमंत्र्यांना यासंदर्भात विनंती करावी. नॉर्मल स्थिती नि्माण करण्याचा प्रयत्न करा…हे प्रयत्न यशस्वी होत नसतील तर त्याचे जे काय परिणाम होतील, त्याची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.