Jitendra Awhad | Sadhvi Pradnyasingh Thakur Team Lokshahi
राजकारण

जे पाकिस्तानचं झालं ते भारताचं करायचं, जितेंद्र आव्हाडांची भाजप महिला खासदारावर टीका

“घरात फक्त चाकू नाही तर RDX, मशीनगन, स्टेनगन, एके 47, रिव्हॉल्वर सगळंच ठेवा.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून प्रचंड गदारोळ सुरु आहे. त्यातच भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी कर्नाटकमध्ये एक विधान केले आहे. त्यामुळे त्या विधानाने त्या चर्चेत आल्या आहेत. हिंदुंनी घराघरात धारदार चाकू ठेवायला हवा, असं विधान प्रज्ञासिंह यांनी केलं आहे. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी ट्विटरवरून आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, खासदार व मालेगाव बॉम्ब ब्लास्टमधील आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर हिने ‘आपल्या घरामध्ये धारदार शस्त्र, चाकू ठेवा जेणेकरून आपल्याला कधीही ते वापरता आले पाहिजेत’ असे विधान केले आहे. खरंतर तिच्यासारखं सगळ्यांनी बॉम्ब स्फोटाचंही प्रशिक्षण घ्यायला हवं. ते ठेवण्याचंही प्रशिक्षण घ्यायला हवं. असे ते पहिल्या ट्विटमध्ये म्हणाले.

त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “घरात फक्त चाकू नाही तर RDX, मशीनगन, स्टेनगन, एके 47, रिव्हॉल्वर सगळंच ठेवा. कारण आता आपल्याला हिंदुस्थान म्हणजेच भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा आहे. जे पाकिस्तानचं झालं ते भारताचं करायचं आहे”, असे मत त्यांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञासिंग?

कर्नाटकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखंच उत्तर दिलं पाहिजे. आपल्या मुलींवर संस्कार घडवा. आपल्या मुलींना गोष्टी समजावून सांगा. एवढंच नाही तर हिंदूंनी आपल्या घरांमध्ये हत्यारं बाळगली पाहिजेत. काहीही नसेल तर भाजी कापण्याच्या सुरीला धार लावून घ्या. स्पष्टच सांगते आहे की आपल्या घरातले चाकू, सुरे जे आपण भाजी कापायला वापरतो ते धारदार असले पाहिजेत. त्यांनी चाकू भोसकून आपल्या हर्षावर हल्ला केला. त्यांनी चाकू सुऱ्यांनी भोसकून बजरंग दल, भाजपा, भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा जीव घेतला आहे. आता शस्त्रांना धार करण्याची वेळ आपली आहे. माहित नाही कधी आवश्यकता भासेल. जर आपल्या घरातली भाजी व्यवस्थित कापली गेली तर आपल्या शत्रूची जीभ आणि त्याचं शीरही आपल्याला प्रसंगी कापता येईल, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू