राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून सरकार मधील मंत्री आणि नेते विविध कारणाने नेहमी चर्चेत असतात. विशेष म्हणजे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे मागील काही काळापासून आपल्या विधानाने चांगलेच चर्चेत येत आहे. परंतु आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य करताना शिवागाळ केली आहे. सत्तारांच्या या विधानाने राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. त्यावरच राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहे. त्याच विधानांवरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी सत्तारांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
काय म्हणाले रुपाली ठोंबरे?
सत्तार यांनी केलेल्या विधानांवर लोकशाहीशी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे राज्यभर वणवा पेटला आहे. मुंबईतील आमचे पदाधिकारी जरी तुम्ही ताब्यात घेतले तरी संपूर्ण महाराष्ट्रात या दालिंदर सत्ताराविरूद्ध, महिलांचा अपमान करणाऱ्या या बोक्यांविरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन होणार असा एकेरी उल्लेख करत त्यांनी रुपाली ठोंबरे यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही महिला राजकारणात अपमान करून घेण्यासाठी आलो नाही. आता कुठे गेल्या चित्रा वाघ? असा सवाल त्यांनी केला. सत्तार हा एवढा मोठा मंत्री होता तर का पळून गेला. तिथेच थांबायचं होत आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी लोकशाहीला दिली.
काय केले होते सत्तारांनी वादग्रस्त विधान?
सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. तर, सत्तारांनी इतकी भि***ट झाली असेल तिलाही देऊ, अशा शब्दात उत्तर दिले.