Jitendra Awhad | Basavaraj Bommai  Team Lokshahi
राजकारण

'बोम्मई हा खोटारडा माणूस' ट्विटवरून जितेंद्र आव्हाड बोम्मईवर भडकले

बोम्मई हा खोटारडा माणूस असून ट्विट केल्यानंतरही जर ही गोष्ट त्यांना 15 दिवसांनी माहिती होत असेल तर मोठी आणि गंभीर गोष्ट आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय घडामोडी सुरु असताना, त्यातच महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद प्रचंड ज्वलंत झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजपासून शिंदे- फडणवीस सरकारचा पहिले हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये बसवराज बोम्मई यांनी आपले ट्विटर हँडल हॅक झाले होते असे त्यांनी सांगितले होते. त्यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरून जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘बोम्मई हा खोटारडा माणूस असून ट्विट केल्यानंतरही जर ही गोष्ट त्यांना 15 दिवसांनी माहिती होत असेल तर मोठी आणि गंभीर गोष्ट आहे. मात्र यावरून बोम्मईंचा खोटारडे पणा दिसून येत आहे. ते खोटं बोलत आहेत. त्यांचे कपडे सांभाळायला आमचे मंत्री जात आहेत मात्र त्यांचे कपड सांभाळताता तुमचे कपडे उतरत आहेत’ असा जोरदार हल्लाबोल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटमुळे आमच्या राज्यातील माणसांची वाहनं फुटली, मराठी माणसांनी मार खाल्ला, त्यांचा अपमान झाला तरीही आम्ही शांत राहिलो. हा बोम्मई दिल्लीत येऊन खोटं सांगतो की, मी ट्विट केलं नाही. हा निव्वळ खोटारडे पणा असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

पुढे ते म्हणाले की, आमच्या सरकारने त्यांना जाब विचारायच्या ऐवजी, यांनी त्यांना म्हणायाल पाहिजे होते, तुम्ही माफी मागा आणि विषय संपवून टाका पण आपले सरकार तसे करताना दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधता साधता त्यांनी केंद्रावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी देशात महागाई, चीन आणि बेरोजगारी याविषयावर भारतात बोलायचं नाही. बोलला तर सत्ताधीश भाजपवाले पठाण, भगवा, निळा या रंगांचं राजकारण करून लोकांना वळवायचं कसं ते त्यांना चांगलं माहिती आहे असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी