राजकारण

....त्यावेळी एकनाथ शिंदेंकडून मंत्री पदाचा दुरुपयोग, राजीनामा द्यावा; खडसेंची मागणी

हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मीनाक्षी म्हात्रे | नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एकनाथ शिंदेंनी मंत्री पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

८३ कोटीचा भूखंड दोन कोटी रुपयांना देणे म्हणजे मंत्री पदाचा दुरुपयोग तत्कालीन नगर विकास मंत्री तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधान परिषदेत केला.

या प्रकरणात न्यायालयाने राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत. झोपडपट्टीसाठी राखीव भूखंड असताना असा हस्तक्षेप केल्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षाच्यावतीने एकनाथ खडसे यांनी सभागृहात केली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी